Tuesday, June 25, 2024

अहमदनगर जिल्ह्यात तीन कृषी खते बियाण्यांचे कायमस्वरुपी परवाने रद्द

जिल्हयामधील 3 कृषि निविष्ठा परवाने कायमस्वरुपी रद्द

3 परवाने निलंबित.

अहमदनगर दि. 17 मे :- सध्या खरीप हंगाम सुरुझालेला असुन बाजारामध्ये शेतक-यांची बि-बियाणे, खते व इतर कृषि निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे. खरीप हंगाम सन २०२४-२५ साठी शेतक-यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होणीचे दृष्टीने कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे. जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करणेत आलेली आहे. तसंच प्रत्येक तालुका स्तरावर तामार निवारण समिती कार्यरत करणेत आलेलो आहे तसेच शेतक-यांना गुणवत्तापूर्ण नियिष्ठाची उपलब्धता बाबी, कमी दजांच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी एकूण १५ भरारी पथके जिल्हयामध्ये कार्यरत करणेत आलेली असून, भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जात आहे. शेतक-यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणा-या विक्री केंद्रांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. निरीक्षकानी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या १ बियाणे विक्री केंद्राचे व २ खते विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत तर १ वियाणे, १ खते व १ किटकनाशके असे ३ परवाने कायमस्वरुपी रड करण्यात आलेली आहेत निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्हयामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकानों कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये अन्यथा त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा कृषि विभागाने दिला आहे.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles