Tuesday, May 28, 2024

रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत आणला खेकडा ,रोहित पवार अडचणीत

रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आपल्या आरोपांच्या संदर्भासाठी त्यांनी थेट जिवंत खेकडाच सादर केला होता. पण आता त्यांच्या या कृतीवर प्राणी अधिकार संघटना ‘पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल’ अर्थात PETA ही संघटना आक्रमक झाली आहे.

यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोग आणि शरद पवारांना पत्र लिहून रोहित पवारांवर कारवाईची मागणी केली आहे.पेटानं म्हटलं की त्यांचं हे कृत्य पशू क्रूरता निवारण अधिनियमाच्या आदर्श आचारसंहितेसह निवडणूक आयोगाच्या निर्देशांचं देखील उल्लंघन आहे. शरद पवार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल काळस्कर यांना लिहिलेल्या पत्रात पेटा इंडियाच्या शौर्य अग्रवाल यांनी म्हटलं की, व्हिडिओवरुन हे स्पष्ट होतं की रोहित पवार पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा आणणार होते हे पूर्वनियोजित होतं. पत्रकार परिषदेत स्टंट करण्यासाठी एका जीवाला अनावश्यक त्रास देण्यात आला आहे.

पेटानं आपल्या पत्रात म्हटलं की, संघटनेनं निवडणूक आयोगाला या बाबीची माहिती देण्यात आला आहे. यामध्ये म्हटलं की निवडणूक प्रचार सभा आणि रॅलीजसाठी प्राण्यांना त्रास दिला जातो आहे. यानंतर निवडणूक आयोगानं राजकीय प्रचारासाठी प्राण्यांच्या वापरावर प्रतिबंध लावला होता.
यामध्ये म्हटलं की, सन २०१३ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक प्रचारादम्यान, गाढव, बैल, हत्ती आणि गाईंच्या वापरावर प्रतिबंध लावला होता. आणि अधिकाऱ्यांनी उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पेटानं रोहित पवारांना देखील पत्र लिहून आणि त्यांच्याकडून खेकडा सोपवण्याची शिफारस केली की त्या खेकड्याची देखभाल केली जावी.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles