Tuesday, February 27, 2024

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका

अंगणवाडी सेविकांचं सध्या आंदोलन आणि संप सुरु आहे. यामुळे ७४ हजार बालके कुपोषित झालीत, असं म्हणत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही पण 58 लाख बालके उपाशी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणात लक्ष घालत आहेत, त्यापेक्षा त्यांनी इकडे लक्ष दिलं पाहीजे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
गेल्या महिन्याभरापासून आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे 74 हजार बालके कुपोषित झाल्याची माहिती सदावर्तेंनी कोर्टात दिली आहे. लसीकरण आणि गर्भवती महिला यांचे आंदोलनामुळे हाल होत असल्याचं जनहित याचिकेत म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी जे बालक कुपोषित झालेत त्यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा सदावर्तेंनी केली आहे.अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रदिर्घकाळ झालेल्या संपामुळे, लहान बालकांना त्यांच्या पौष्टिक अन्नापासून वंचित राहावे लागत आहे. त्याचबरोबर लसीकरणापासून ते दूर आहेत, त्यामुळे आज 74 हजार बालके देखील कुपोषणाचा सामना करतायत, असं म्हणत सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीये.

अत्यंत गरीब कुटुंबातील दारिद्र रेषेखालील कुटुंबातील मुलं हे राज्यभरात अंगणवाडी शाळांमध्ये जात असतात. प्रोटीन युक्त जेवण, व्यायाम, प्री स्कूल एज्युकेशन त्याचबरोबर विविध शैक्षणिक उपक्रम जे युनिसेफ मार्फत आणि आयसीडीएस मार्फत चालतात ते चालवले जातात. परंतु त्या सर्व बाबींपासून सदर बालके वंचित राहत आहेत.

तसेच ज्या गर्भवती केलेल्या असतात त्यांना देखील लसीकरण आणि पैष्टिक अन्नापासून वंचित राहावे लागत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महिला बाल आयुक्तांनी पत्रामध्ये मान्य केलं की बालके हे अन्नापासून वंचित आहेत. असे असताना राज्यात अनेक विविध विषयांवर चर्चा होत आहेत. राजकारण होत आहे परंतु विद्यार्थ्यांना बालकांना अशा गोष्टींचा सामना करणं हे भारतीय संविधानातील आर्टिकल 21 चा भंग असल्याने तातडीने सदर संप अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी थांबवावा असं सदावर्तेंनी म्हटलंय.

तसेच संबंधितांची चौकशी करावी. जर कुपोषित बालकांपैकी एखाद्या बालकाला काही कमी जास्त झालं असेल तर, संबंधित व्यक्तीवर कारवाई व्हावी. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मागण्या बरोबर असू शकतात की नाही हा जरी मुद्दा असला तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या केसमध्ये स्पष्टपणे संप बेकायदेशीर सांगितला असताना बेकायदेशीर संप एवढे दिवस चालवणे आणि त्यातून लहान बाळांचे हाल होणे हे अत्यंत वेदनादायी आहे. म्हणून चौकशी झाली पाहिजे आणि बाळांना मोबदला मिळाला पाहिजे याकरिता जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल करण्यात आली आहे, असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलंय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles