Friday, March 28, 2025

विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती कमी जास्त होत आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नाहीत. नेमके दर का कमी होत नाहीत? या प्रश्नाने सर्वसामान्य जनता चिंतेत आहेत. मात्र, राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार नाही, असं म्हणता येणार नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या आधी दरात कपात होण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. लिटरमागे किमान 2 रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीपुर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची आशा व्यक्त केली जातेय. राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याचा अंदाज आहे. पण पेट्रोल आणि डिझेलमध्ये किती कपात होणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. तर या दोन्हीमध्ये प्रत्येकी 2 रुपयांची घसरण होणार असल्याचंही बोललं जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles