पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडते. प्रत्येक घरात एकतरी वाहन हे असतेच. त्यामुळे महिन्याभराच्या खर्चात पेट्रोल डिझेलचा खर्च होतो. त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होते. पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात बदल झालेले नाही.
पेट्रोल डिझेलचे भाव हे प्रत्येक राज्यानुसार, शहरानुसार बदलत असतात. प्रत्येक शहरात हा पेट्रोल डिझेलवर लागणारा वॅट दर वेगवेगळा असतो. त्यामुळे हे दर सतत बदलत असतात.पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात.
मुंबईत पेट्रोलचे भाव १०३.४४ रुपये आहे तर डिझेलचे भाव ८९.९७ रुपये आहे.पुण्यात पेट्रोलची किंमत १०३.७६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.३० रुपये आहे.ठाण्यात पेट्रोल १०३.५१ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.०३ रुपये आहे.नाशिकमध्ये पेट्रोल १०४.७५ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.२६ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५२ रुपये आहे.कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत १०५.३५ रुपये आहे तर डिझेलची ९१.८६ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.३४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.८६ रुपये आहे.