नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात होती. देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करावे की नाही, यावर पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयामध्ये बराच काळ चर्चा सुरू होती. समजा, पेट्रोल अन् डिझेल स्वस्त केले तरी ते किती करावे? दोन्ही मंत्रालयांपैकी त्याचा भार कोण उचलणार, अशीही चर्चा सुरू होती. या संपूर्ण खर्चाचा बोजा तेल कंपन्यांवरच टाकावा का? यावरही विचारविनिमय सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, या संपूर्ण प्रकरणावर दोन्ही मंत्रालयांमध्ये एकमत झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याची तयारीही सुरू झाली आहे. ज्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
नवीन वर्षात2024 च्या सुरूवातीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८ ते १० रुपयांची कपात करून मोठी घोषणा करू शकतात. देशातील महागाई कमी करणे हे सरकारचे प्राथमिक लक्ष्य बनले असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.