पेट्रोलच्या वाढणाऱ्या किंमती पाहता गाडी घ्यायचं की नाही याचा विचार सर्वसामान्य माणसाला महागात पडतो. वाढत्या पेट्रोलचे दर खिशाला परवडत नाहीत. मात्र आता यावरही नितीन गडकरींनी सर्वसामन्य लोकांना गुडन्यूज दिली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलताना म्हणाले की, “आमच्या सरकारची मानसिकता आहे की शेतकऱ्यांनी केवळ ‘अन्नदाता’ बनू नये, तर ‘ऊर्जादाता’ही व्हावे. सर्व वाहने आता शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या इथेनॉलवर चालणार आहेत.
सरासरी 60% इथेनॉल आणि 40% वीज घेतली तर पेट्रोल 15 रुपये प्रतिलिटर दराने स्वस्त होईल. लोकांना फायदा होईल, प्रदूषण आणि आयात कमी होईल. 16 लाख कोटी रुपये जे कच्चं तेल खरेदी करण्यासाठी वापरलं जातं ते, शेतकऱ्यांच्या घरी जाईल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ”