नाशिकमध्ये सीबीआयने प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त आणि अन्य दोन जणांना लाच घेतल्याप्रकरणी अटक केलीय. दोन लाखाची लाच घेताना सीबीआयने भविष्य निर्वाह निधी आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला अटक केली. नाशिक येथील रहिवासी असलेल्या EPFO अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ईपीएफओ (EPFO) अधिकार्यावर खासगी पीएफ (PF) सल्लागारासोबत अवाजवी रक्कम मागण्याचा आणि स्वीकारण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या फर्मशी संबंधित पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी पीएफ आयुक्ताने २ लाख रुपयांची लाच घेतली होती. ईपीएफओ अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे खासगी पीएफ सल्लागाराला लाच देण्याचे सांगितले होते.
अधिकाऱ्याने लाच मागितल्यानंतर तक्राराने सीबीआयकडे तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे लाच मागितली होती. सीबीआयने सापळा रचून खासगी व्यक्ती आणि ईपीएफओच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं. नाशिक येथे सात ठिकाणी झडती घेण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम, डायरीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले.
सीबीआयची मोठी कारवाई; लाखांची लाच घेताना आयुक्तांना ठोकल्या बेड्या
- Advertisement -