अभिनेता भुषण प्रधान यानं व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा बायको समुद्रकिनारी फोटोशूट करत आहेत. व पाठीमागून सासूबाई आपल्या सूनेला पोझ कशा द्यायच्या ते सांगत आहेत. सून देखील सासूच्या सुचना काळजीपूर्वक ऐकतेय. दरम्यान सासूनं सूनेची ओढणी पकडली आहे. जेणेकरून ती फोटोमध्ये छान दिसावी. दरम्यान त्यांच्यासोबत असलेला एक वृद्ध व्यक्ती या कपलचे फोटो काढत आहे. हा व्यक्ती सूनेचे सासरे असावेत अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण कुटुंबाचं हे फोटोशूट पाहून सर्वच जण थक्क झाले आहेत.






