Wednesday, May 14, 2025

अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग? माजी नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट

पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणेसह 16 नगरसेवकांनी काल मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. लांडेंच्या सोबत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि माजी नगरसेवकांसह 15 पदाधिकारी ही शरद पवारांच्या तालमीत परतण्याची शक्यता आहे. लोकसभेत शरद पवारांचा चाललेला करिश्मा पाहून विलास लांडे घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र भोसरी विधानसभा विलास लांडे आणि त्यांचे नातेवाईक अजित गव्हाणे ही लढण्यास तीव्र इच्छुक आहेत. परंतु महाविकासआघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला की ठाकरेंच्या शिवसेनेला सुटणार, यावर पुढची भूमिका ठरणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles