असं म्हणतात की कोणाच्याही सहनशीलतेची परीक्षा घेऊ नये, कारण कधी कधी असं करणं खूप महागात पडू शकतं. विशेषत: अनेकांना प्राण्यांना विनाकारण त्रास देणं महागात पडतं. हेच दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीला ऑक्टोपस सोबत मस्ती अंगाशी आली. एक व्यक्ती समुद्र किनारी ऑक्टोपसची मस्ती करत होता. तो त्याच्या हाताला पूर्ण पणे चिकटतो. फेव्हिकॉल लावल्यासारखा तो व्यक्तीच्या हाताला चिकटतो. व्यक्ती त्याला काढण्याचा खूप प्रयत्न करतो पण ऑक्टोपस पुन्हा पुन्हा त्याच्या हाताला चिकटतो. हे बघूनच फार भीती वाटत आहे, मात्र तो तरुण बिनधास्त हसत आहे.
विनाकारण त्रास देणं महागात….’ऑक्टोपस’ सोबत मस्ती अंगाशी आली..viral video
- Advertisement -