केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी नवनव्या योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळतो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना देखील जाहीर केली आहे. या योजनेचं नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना’ असं आहे. या योजनेत शेतकऱ्यांना महिन्याला ५५ रुपये भरावे लागतात, त्यानंतर ६० वर्षांनंतर महिन्याला ३००० रुपये मिळण्यास सुरु होते.
वयाच्या ६० वर्षानंतर शेतकरी शारीरिकरित्या काम करण्यास सक्षम राहत नाही. अशावेळी या ज्येष्ठ शेतकऱ्यांना उदारनिर्वाहासाठी घरातील दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहावं लागतं. यामुळे या शेतकऱ्यांसाठी सरकारने ही योजना आणली आहे.
दरमहा भरा ५५ रुपये
केंद्र सरकारने २०१९ साली ‘प्रधानमंत्री किसान मानधन योजना’ सुरु केली. छोट्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे. १८ ते ४० वर्ष वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत वेगवेगळ्या वयोगटातील वर्गाला वेगळा प्रीमियम भरावा लागतो.
या योजनेत प्रीमियम हा ५५ रुपये ते २०० रुपयांपर्यंत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर ३ हजार रुपये पेन्शन मिळते. काही कारणात्सव शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला १५०० मासिक पेन्शन दिली जाते.