शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहे. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. आत्तापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 18 वा हप्ता कधी मिळणार याची सध्या चर्चा सुरु आहे. मात्र, लवकरच 18 वा हप्ता देखील मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आता 18 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेंतर्गत, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करु शकतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील. आतापर्यंत सरकारने 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. 18वा हप्ताही पुढील महिन्यात जाहीर केला जाऊ शकतो.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी शेतकऱ्यांना काही नवीन सूचनांचे पालन करावे लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत त्यांना 18 व्या हप्त्याची 2000 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळं लवकरात लवकर दिलेल्या सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांनी कामे पूर्ण करुन घ्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे.