पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील महिला कमांडोचा हा फोटो अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी स्टेटसला ठेवला. ज्यानंतर या महिला कमांडोचा फोटो व्हायरल झाला आहे. अनेक भाजपा नेत्यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर हा फोटो पोस्ट केला आणि महिला शक्तीचं उत्तम उदाहरण हे मोदींनी दाखवून दिल्याचा उल्लेख केला आहे. तसंच अनेकांनी महिला कमांडो पहिल्यांदाच मोदी यांच्या ताफ्यात दिसली आहे हे चित्र सकारात्मक आहे अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही महिला कमांडो एसपीजी कमांडो असावी अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो संसदेच्या परिसरातला आहे. संसदेच्या परिसरात महिला एसपीजी कमांडो तैनात असतात.