पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. आता ह्यात व्हॉट्सअॅपचा देखील समावेश झाला आहे. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअॅपवर PM Narendra Modi सोबत जोडले जाऊ शकता. व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट फीचरच्या मदतीनं तुम्ही नंबरविना देखील पंतप्रधानांचं चॅनेल जॉइन करू शकता. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं गेल्या आठवड्यातच WhatsApp Channel फीचर रोलआउट केलं आहे, जो हळूहळू सर्व युजर्सपर्यंत पोहोचत आहे. ह्या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो करू शकता.जर तुमच्याकडे व्हॉट्सअॅपवर चॅनेल फीचर नसेल तर अॅप अपडेट करा. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करा. आता तुमच्या Status च्या जागी तुम्हाला Update चा ऑप्शन दिसेल.
त्यावर क्लिक करताच तुम्हाला Channels दिसतील. तिथे Find Channels च्या ऑप्शनवर क्लिक करा आणि Narendra Modi लिहा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर पंतप्रधान मोदींच चॅनेल येईल, जे तुम्ही फॉलो करू शकता. फॉलो करण्यासाठी ‘+’ बटन टॅप करा.