पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका मुलाखतीची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा होऊ लागली आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार आहेत. पण तिथे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ही माझी बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे. उद्धव ठाकरेंचा मी नेहमीच सन्मान करतो. ते काही माझे शत्रू नाहीत. जर त्यांच्यावर काही संकट आलं. त्यांना काही अडचणी आल्या तर मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेन. बाळासाहेबांच्या विचारांसाठीच मी जगतोय. माझ्यावर त्यांचं जे प्रेम होतं या त्यांच्या कर्जाचं मला कधीच विस्मरण होणार नाही, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.