Saturday, May 18, 2024

नरेंद्र मोदी म्हणाले, मी मुस्लिम कुटुंबात‌ राहिलो आहे, त्यांच्या बरोबर जेवलो आहे…

मी मुस्लिम कुटुंबात राहिलो असून त्यांच्याबरोबर जेवलोसुद्धा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. न्यूज १८ ने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. वाराणसी लोकसभा मतदारसंघातील गंगा नदीच्या काठावर ही मुलाखत पार पडली.

माझे शासन मॉडेल धर्म किंवा जातीच्या आधारावर आधारलेलं नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले की, “मी लहानपणी मुस्लिम कुटुंबात राहिलो आहे. माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत. पण २००२ नंतर माझी प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न करण्यात आले”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले.

“आमच्या शेजारी मुस्लिम कुटुंबे राहत होती. ईदच्या दिवशी आम्ही माझ्या घरी जेवण बनवत नसे कारण शेजारच्या मुस्लिम घरातून जेवण यायचे. मोहरमच्या दिवशी आम्हाला ताजियाच्या खाली जायला शिकवले गेले ”, असंही ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, “२००२ नंतर जेव्हा त्यांची प्रतिमा डागाळली तेव्हा त्यांनी जमिनीवरील वास्तव जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. “अहमदाबादमध्ये मानेक चौक नावाची जागा आहे जिथे लोक संध्याकाळी जेवायला जातात. पण दिवसा सर्व व्यापारी मुस्लिम आणि सर्व खरेदीदार हिंदू आहेत. मी काही लोकांना त्या मार्केटमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी पाठवले. त्यांच्यापैकी एकजण माझ्याविरोधात बोलला तेव्हा दुकानदाराने त्याला थांबवले आणि म्हणाले, ‘मोदींविरुद्ध एक शब्दही बोलू नका. मोदींमुळे माझी मुलं शाळेत जात आहेत. जवळपास ९० टक्के दुकानमालकांचे म्हणणे असेच होते”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles