भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेले पैसे देशातील गरिबांना परत करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे पर्याय शोधले जात आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
भारतीय दंड संहितेच्या जागी आणण्यात आलेल्या न्याय संहितेत यासंदर्भात काही तरतुदी आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच तपास यंत्रणांनी आतापर्यंत १.२५ लाख कोटी रुपये जप्त केले आहेत ”,
मला मनापासून वाटते, की हा पैसा गरीबांना परत मिळावा, कारण हा पैसा भ्रष्टाचाऱ्यांनी गरिबांजवळून लुटला आहे. यासाठी केंद्र सरकार विविध पर्याय शोधत आहे”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच “मला यासाठी कायद्यात बदल करावे लागले तर मी ते करेन. याबाबतीत मी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करतो आहे”, असेही ते म्हणाले.