Friday, February 23, 2024

मोदींची मोठी घोषणा….१ कोटी घरांसाठी पंतप्रधान सूर्योदय योजना…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत देशातल्या 1 कोटी घरांच्या छतावर सोलर लावण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली. ‘सूर्यवंशी भगवान श्रीरामांच्या प्रकाशातून नेहमीच उर्जा मिळते. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ प्रसंगी माझ्या संकल्पाला आणखी बळ मिळालं. भारतीयांच्या घरांच्या छपरावर त्यांची सोलर रूफ टॉस सिस्टिम असावी,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
‘अयोध्येहून परतल्यानतंर माझा पहिला निर्णय, 1 कोटी घरांवर रूफटॉप सोलर लावण्याचं आमचं लक्ष्य आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या माध्यमातून याचा प्रारंभ होईल. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गाला वीजेचं बील कमी येईल, तसंच भारत उर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles