पोलिस अधिक्षक कार्यालयात सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी याची शुक्रवारी बैठक

0
183

रिटायर्ड पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संस्था अहमदनगर, यांचे अध्यक्ष नाथा घुले , सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी, यांची मिटिंग दि.१७/०६/२०२२ रोजी शुक्रवार सकाळी ११.०० वा. मनोज पाटील , पोलिस अधिक्षक, अहमदनगर यांचे प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षते खाली पोलिस अधिक्षक कार्यालय, अहमदनगर येथे आयोजित केली आहे.
सदर मिटिंग मध्ये पेन्शन बाबत अडचणी व इतर रखडलेली इतर बिले मंजूर होणे बाबत इतर महत्त्वाचे विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. या मिटिंग मध्ये पोलिसांची मुले / मुली यांना स्कील डेव्हलपमेंट कोर्स व नोकरी विषयी मार्गदर्शन करण्यासाठी “प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र, अहमदनगर यांचे वतीने मार्गदर्शन खालील कोर्सेस मध्ये करणार आहेत.
१) हाउस कीपिंग २) इलेक्ट्रिक ३) प्लंबिंग ४) जनरल फायर ५) वेल्डिंग ६) CNG मशीन ऑपरेटर ७) नर्सेस ८) फोर व्हीलर (चार चाकी) टू व्हीलर मेकेनिकाल वगैरे कोर्सेस असून त्यासाठी विनामुल्य ॲडमिशन, भोजन व रहाण्याची सोय विनामुल्य करण्यात येणार आहे.
सदर मेळाव्यास पोलिस अधिक्षक मनोज पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना एस.पी. ऑफीस अहमदनगर, येथे १७/०६/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा न चुकता हजर रहावे असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाथा घुले यांनी कळविले आहे.