अहमदनगर -मुला-मुलींना करण्यासाठी अश्लिल चाळे जागा उपलब्ध करून दिल्लीगेट, सिध्दीबाग तीन कॅफेवर तोफखाना देणाऱ्या परिसरातील पोलिसांनी छापेमारी केली. तीन वेगवेगळ्या फिर्यादीवरून दिल्लीगेट येथील युनिक स्टार कॅफे, सिध्दीबाग येथील ब्लक कॅफे, तसेच दिल्लीगेट येथील स्पाय बिल्डींगच्या पाठीमागील कॅफे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅफे चालक आकाश पांडुरंग जाधव (वय २६, रा. मळा, बालिकाश्रम रस्ता), आदिराज विलास दोमल (वय २२, रा. वाघमळा, बालिकाश्रम रस्ता),मंगेश गोरख कोळगे (वय २३, रा. चास, अकोळनेर ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. कॅफेत प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करून, पडदे लावून अंधार करून शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, अंमलदार सतीश त्रिभुवन, बाळासाहेब भापसे, सतीश भवर, वसीम पठाण, शिरीष तरटे, सुमित गवळी यांच्या पथकाने या कॅफेवर छापेमारी केली. त्या ठिकाणी काही मुले-मुली अश्लिल चाळे करताना व आढळले. त्यांना Sandy समज देऊन सोडण्यात आले. तर कॅफे चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.