अल्पवयीन अपहरण पिडीत मुलीची १२ तासांत सुटका: कोतवाली पोलिसांची कारवाई
दि.२०/०८/२०२४ रोजी कोतवाली पोलीस ठाणे गु.र.नं ९३५/२०२४ भारतीय न्यास सहिता कलम १३७(२), प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील पिडित मुलगी अल्पवयीन होती. आरोपी हा विधी संघर्ष बालक असुन सदर आरोपी कडे पैसे नव्हते आणि तो अज्ञान असल्याने यातील पिडीत मुलगी हिची सुरक्षा आणि तिचे सोबत कुठे बाहेर असतांना कोणताही गैर प्रकार घडू नये तसेच त्यामुळे महिला सुरक्षा अनुशंगाने कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऊभा राहु नये म्हणून तात्काळ तपास करणे गरजेचे होते त्यामुळे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सोो, यांचे आदेशान्वे पोनि प्रताप दराडे साहेब यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शोध पथकाला तपास करणेचे आदेश दिले यातील पथकाकडे आरोपी बाबत कोणतीही माहीती नसतांना बेसीक पॉलिसिन्गचा वापर करुन आरोपींचे नातेवाईक व आरोपीचे जवळचे मित्र यांचा पथकाने शोध घेवुन त्यांचे कडे बारकाईने तपास करीत असता त्यातील एका मित्राला आरोपीने पैशाची मागणी केली असता त्या मित्रांकडे अधिक चौकशी करीता व सदर गोष्टीचा बारकाईने तपास करुन पिडीत मुलगी व विधीसंघर्ष बालक हे कर्जत रेल्वे स्टेशन जि. रायगड येथे असले बाबतची माहीती गुन्हे शोध पथकास मिळाल्याने पथकाने कर्जत जि. रायगड येथे जावुन तेथील कर्जत जि. रायगड रेल्वे पोलीसांची मदत घेवुन सदर पिडीत मुलगी व विधीसंघर्ष बालक व त्याचा एक अल्पवयीन मित्र यांचा कर्जत रेल्वे परीसरात शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुढील तपास करीता कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेवुन आले आहे पुढील तपास सपोनि विकास काळे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि विकास काळे,पोसई प्रविण पाटील व गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ योगेश भिंगारदिवे,विशाल दळवी, गणेश धोत्रे,सलीम शेख, नकुल टिपरे, विजय काळे, पोकाँ अभय कदम, सतिश शिंदे,मपोकाँ योगिता साळवे व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे