१५ मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास कोतवाली पोलीसांनी केले जेरबंद: 5,25.000/- किंमतीचा मुददेमाल हस्तगत
दि.08/08/2024 रोजी सकाळी कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकामधील अंमलदार मा. पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हददीमध्ये चेन स्नॅचिग तसेच मोटार सायकल चोरी करणारे इसमांची माहीती काढणे कामी पेट्रोलिंग करत असताना माळीवाडा इंपिरोयल चौक, या ठिकाणी एक इसम रोडचे कडेला पार्क केलेल्या वाहनांच्या आसपास विनाकारण संशयीतरित्या फिरत असताना मिळून आला असता त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गंगाराम बंडु कुन्हाडे वय 32 वर्ष रा. मु.पो. टाकळी अंबड ता. पैठण जि.छ. संभाजीनगर (औरंगाबाद) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी करुन त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे मोटार सायकली चोरीविषयी चौकशी केली असता त्याने सांगितले की, सध्या मी काहीएक कामधंदा करत नसल्याने मला दारु पिण्याकरीता व फिरायला पैशाची आवश्यकता असल्याने माळीवाडा परीसरातुन काही मोटार सायकली चोरी केलेल्या असुन त्यास चोरलेल्या मोटार सायकलबाबत चौकशी केली असता, त्याने सांगितले की, मो अहमदनगर शहरामधुन वेगवेगळ्या ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी करुन त्या काही दिवस वापरुन त्यातले पेट्रोल संपल्यावर त्या वेगवेगळ्या ठिकाणी लपवुन ठेवलेल्या असून मी त्यांची विक्री करीता ग्राहक शोधत आहे. असे सांगितल्याने सदर मोटार सायकली त्याच्याकडुन पंचासमक्ष खालील प्रमाणे ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. तरी पुढील तपास पोहेकों / राजेंद्र औटी हे करीत आहेत.
सदर आरोपीकडुन वेगवेगळ्या ठिकाणाहुन चोरी केलेल्या एकुण 15 मोटार सायकल असा एकुण 5,25,000/- (पाच लाख पंचविस हजार रुपये) किंमतीच्या मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो, मा अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खैरे, मा उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री अमोल भारती सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे, सपोनी विकास काळे, पोसई महेश शिंदे, कृष्णकुमार शेंदवाड गुन्हे शोध पथकाचे पोहेकों/सुर्यकांत डाके, विक्रम वाघमारे, विशाल दळवी, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, रियाज इनामदार मपोना/संगिता बडे, पोना/ अविनाश वाकचौरे, पोना/ सलिम शेख पोकों/ सत्यम शिंदे, अभय कदम, अमोल गाडे, सुजय हिवाळे, अनुप झाडबुके, सचिन लोळगे, अतुल काजळे, सतिष शिंदे, सुरज कदम, तानाजी पवार, दिपक रोहोकले राम हंडाळ, शिवाजी मोरे, तसेच सायबर सेलचे राहुल गुंडु यांनी केली आहे.