Monday, September 16, 2024

तरूणाची अडीच लाख रुपयांची फसवणूक ,नवरीला घ्यायला आले पोलिस! लग्नाचा खर्चही वाया गेला नी नवरीही गेली..

अहमदनगर-लग्न लावुन देतो, असे सांगुन राहुरी शहरातील कनगर परिसरात रहिवासी असलेल्या एका शेतकरी कुटुंबातील तरूणाची अडीच लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरीला घ्यायला पोलिस पथक आल्याने नवदेवासह त्याचे नातेवाईक भयभीत झाले.

राहुरी शहरातील कनगर रोड परिसरात एक 30 वर्षीय शेतकरी तरुण बर्‍याच दिवसांपासून लग्नासाठी मुलगी शोधत होता. याचा गैरफायदा घेऊन राहाता येथील एका दलालाने त्याला मुलगी दाखवली. सदर मुलगी नेवासा येथील असल्याचे सांगितले. मुलाची पसंती झाल्यानंतर एजंटने नवदेवाकडून अडिच लाख रुपये घेऊन राहता येथे दोनशे ते तीनशे नातेवाईक व मित्र परिवाराच्या उपस्थित लग्न लावून दिले. या घटनेतील नवरी मुलगी ही मुळची जळगाव येथील असून तिच्या आई व मामाने जळगाव पोलीस ठाण्यात आठ ते दहा दिवसांपूर्वी मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला होता.

त्यानुसार जळगाव येथील पोलिस पथक सदर तरुणीचा शोध घेत राहुरी येथे आले. आणि नवदेव मुलाच्या घरातून सदर तरुणीला ताब्यात घेतले. दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरीला घ्यायला पोलिस पथक आल्याने नवदेवासह त्याचे नातेवाईक भयभीत झाले. पोलिस पथकाने नवरी व नवरदेवाला ताब्यात घेऊन पोलीस कारवाई केली. त्यानंतर राहुरी पोलिस पथकाकडून सदर तरुणीला जळगाव येथील पोलिस पथकाच्या ताब्यात दिले. नंतर जळगाव येथील पोलिस पथक तरुणीला घेऊन रवाना झाले. या दरम्यान आपली अडीच लाखाची फसवणूक झाल्याचे नवरदेव व त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आले.
सध्या सर्वत्र नवरी मुलगी भेटणे अवघड झाले आहे. याचा गैरफायदा घेऊन काही फसवणूक करणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. लग्नासाठी नवरी मुलगी दाखवतो असे सांगून नवदेवासह त्याच्या नातेवाईकांची फसवणूक होत आहे. नवरी मुलगी पाहताना त्या मुलीबाबत तसेच तिच्या नातेवाईकांबाबत सविस्तर चौकशी करून लग्न करावे. असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles