Saturday, October 12, 2024

कृषी सोलर पंप योजनेत सव्वा पाच लाखांची फसवणूक, पाथर्डी तालुक्यात एजंट विरोधात पोलिसात तक्रार

पाथर्डी-शासन अनुदानातून मिळणार्‍या कृषी सोलर पंप योजनेत आईच्या नावावर मंजूर झालेला पंप मध्यस्थाने परस्पर दुसर्‍याला विकत सव्वा पाच लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार उमेश वाखुरे (रा. पाथर्डी) याने पोलिसांकडे केली आहे. याबाबत वाखुरे याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, खेर्डे गावात आई हौसाबाई वाखुरे हिच्या नावावर शेत जमीन आहे. मी दुलेचांदगाव येथील एजंट प्रशांत मरकड याच्यांकडे कागदपत्रे सादर करत त्याला 75 हजार रुपये दिले व ओटीपीसाठी माझा मोबाईल क्रमांक दिला.

मात्र एजंटने संबंधित कंपनी, कंपनीचे कर्मचारी यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे व बनावट सर्व्हे रिपोर्ट तयार करून आम्हाला मंजूर झालेला सोलर पंप अ परस्पर दुसर्‍याला देऊन फसवणूक केली आहे. योजनेत ऑनलाईन अर्ज भरतांना एजंटने माझा मोबाईल नंबर न टाकता दुसर्‍याचा नंबर टाकला. या संदर्भात महावितरणच्या कार्यालयात गेलो असता, तेथील संगणकामध्ये अपलोड करण्यात आलेला आईचे दुसर्‍याच महिलेचा आहे. त्यांना लाभार्थी म्हणून दाखवण्यात ओले आहे. या फोटोत संबंधीत एजंट यांचाही फोटो असून संबंधीत सोलर पंप हा दुलेचांदगाव येथील शेतात बसवण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात फसवणूक झाली असून फसवणूक करणार्‍याच्या विरोधात कारवाई करून नवीन पंप द्यावा, अशी मागणी वाखुरे याने आपल्या तक्रारीत केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles