वाळुंज, ता. नगर परिसरात दरोड्याचे तयारीत असलेले 5 सराईत आरोपी व
1 विधीसंघर्षीत बालक 58,100/- रुपाये किंमतीचे साधनासह जेरबंद,
स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, सफौ/दत्तात्रय हिंगडे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, बापुसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे, पोना/रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, पोकॉ/सागर ससाणे, प्रमोद जाधव व चासफौ/उमाकांत गावडे यांचे पथक नेमुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचना प्रमाणे पथक आरोपींची माहिती काढत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, दिनांक 08/01/2024 रोजी रात्री नगर ते सोलापुर जाणारे रोडवरील वाळुंज शिवार, पारगांव फाटा, ता. नगर या ठिकाणी 5 ते 6 इसम कोठे तरी दरोडा घालण्याचे तयारीत अंधारात थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना दिल्या. पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी वाळुंज शिवार, पारगांव फाटा, ता. नगर येथे जावुन खात्री करता अंधारात रोडचे कडेला, झुडपाच्या मागे काही संशयीत इसम दबा धरुन बसलेले दिसले. पथकाची खात्री होताच संशयीतांना पकडण्याचे तयारीत असतांना, संशयीतांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन शिताफीने योग्य त्या बळाचा वापर करुन त्यांना ताब्यात घेतले व सदर ठिकाणी थांबण्याचे कारणाबाबत विचारपुस करता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना त्यांचे नावे गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) साईनाथ तुकाराम पवार वय 22, 2) आकाश गोरख बर्डे वय 28, 3) विशाल पोपट बर्डे वय 18, 4) नवनाथ तुकाराम पवार वय 27, 5) अमोल दुर्योधन माळी वय 18 व 6) विधीसंघर्षीत बालक सर्व रा. कुरणवाडी, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडती व कब्जात 2 तलवार, 1 टामी, 3 विवो व 1 रेमडमी कंपनीचा मोबाईल फोन, नायलॉन दोरी, लाकडी दांडके व मिरचीपुड असा एकुण 58,100/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पोहेकॉ/ज्ञानेश्वर शिंदे ने. स्थागुशा यांचे फिर्यादी वरुन नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 11/2024 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.