Wednesday, April 30, 2025

नगर शहरात ५ कॅफे शॉपवर पोलिसांनी छापेमारी करत कारवाई, कॅफे चालकांवर गुन्हे दाखल

नगर – शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गाळ्यामध्ये प्लायवुडचे कंम्पार्टमेंटला पडदे लावुन अंधार करून शाळा कॉलेजमधील मुला मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणार्‍या ५ कॅफे शॉपवर तोफखाना पोलीसांनी शुक्रवारी (दि.८) कारवाई करून कॅफे चालकांवर गुन्हे दाखल केले आहे. तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सावेडी उपनगरातील कोहीनुर ऑर्केड बिल्डींगमध्ये बेसमेंट मध्ये असलेले कॅफे स्टेला, बालिकाश्रम रोड येथे डाऊन कॅफे, पारिजात चौक, गुलमोहर रोड येथे हंगरेला कॅफे, प्रेमदान चौक, तारापान शेजारी द व्हेनी कॅफे, पंपिंग स्टेशन रोड, ताठे नगर येथे वन स्टार कॅफे अशा विविध कॅफेमध्ये कॅफे शॉपचे चालक कॉफी शॉप बोर्ड लावुन कुठलाही कॉफी हा पेय तसेच इतर कुठलेही खाद्य पदार्थ विक्रीसाठी न ठेवता आतमध्ये लाकडी कंपार्टमेंट बनवुन त्यास बाहेरुन पडदे लावुन आतमध्ये बसण्यासाठी सोफे ठेवुन मुला मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत असल्याची माहिती तोफखान्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाल्याने सदर माहितीची दखल घेवुन त्यांनी तातडीने पथके नेमून कारवाईचे आदेश दिले. या पथकांनी सदर ठिकाणी जावून छापे टाकले असता कॅफेमध्ये प्लायउड बोर्डने पार्टीशन केलेले वेगवेगळे कंपार्टमेंट दिसले. त्यात काही मुले व मुली या अश्लिल चाळे करताना दिसले. कॉफी शॉपमध्ये दर्शनी भागात कॉफीशॉपचा परवाना दिसुन आला नाही किंवा कॉफी बनविण्यासाठी लागणारे साहित्य कॉफी पावडर, साखर, गॅस किंवा इतर साधधे दिसुन आले नाही. सदर ठिकाणी अनाधिकृतपणे अश्लील चाळे करण्यासाठी अडोशासाठी बनविलेले पडदे तात्काळ काढुन टाकण्यात आले व तेथे मिळुन आलेल्या मुला मुलींना तोंडी समज देवुन सोडण्यात आले. कॅफे स्टेला याचा चालक फरहान सरफराज शेख (रा.दौंण्ड रोड, हॉटेल शितलमागे, केडगाव), डाऊन कॅफेचा चालक शक्ती मनोहर सिंग (रा.भिमा सिकर, राज्य राजस्थान), हंगरेला कॅफे चालक विशाल भाऊसाहेब पालवे (रा. कोल्हार ता पाथर्डी), द व्हेनी कॅफे चालक रंजीत जवाहर पंडित (मुळ रा.इंदिरानगर, एफ ४४, टेल्को रोड, चिंचवड स्टेशन जवळ, पंचशील हॉटेल पुणे), वन स्टार कॅफे चालक ओंकार कैलास ताठे (रा. ताठे नगर, सावेडी) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१ (क) (क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई पो.नि. मधुकर साळवे यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पो.हे.कॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, दिनेश मोरे, पो.ना.अविनाश वाकचौरे, संदिप धामणे, वसिम पठाण, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, सुरज वाबळे, पो.कॉ. सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, सचिन जगताप, शिरीष तरटे, सतिष भवर यांनी केली आहे. पोलिसांचे नागरिकांना आवाहन सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कॉलेज, लासेसला जाणार्‍या मुलांच्या नातेवाईकांनी आपल्या पाल्याच्या वर्तणुकीवर बारकाईने व जबादारीने लक्ष ठेवावे. आपल्या पाल्याचे मित्र कोण आहेत, ते बाहेर काही टवाळखोरी करतात काय? याबाबत बारकाईने लक्ष ठेवावे. यापुढे असे टवाळखोर व सार्वजनिक ठिकणी बेशिस्त वर्तणूक करणारी इसम आढळुन आल्यास तोफखाना पोलीस स्टेशनकडुन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची खबरदारी घ्यावी, असा इशारा पो. नि. मधुकर साळवे यांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles