Wednesday, April 30, 2025

नगर शहरातील बँक फसवणूक प्रकरणी ….गुन्ह्यात दोघांना पोलिस कोठडी

नगर – नगर शहर सहकारी बँकेच्या ५ कोटी ७५ लाखांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शहरातील चार्टर्ड अकाऊंटंट विजय विष्णुप्रसाद मर्दा (वय ५७, रा. रिद्धीसिद्धी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर रोड) व वैद्यकीय मशिनरी वितरक जगदीश बजाराम कदम (वय ५०, रा. समर्थ नगर, नवी सांगवी, पुणे) या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.१३) सायंकाळी अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने दि.१८ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सीए विजय मर्दा यास दापोली जवळून ताब्यात घेण्यात आले तर कदमला पुण्यात पकडण्यात आले आहे. शहर सहकारी बँकेच्या ५ कोटी ७५ लाखांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी डॉ.निलेश शेळके सह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल आहे. राहुरी येथील डॉ.सौ.रोहिणी सिनारे यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे. आरोपी निलेश शेळके याने फिर्यादी सिनारे व इतरांना विश्वासात घेवून एम्स नावाचे हॉस्पिटल नगरमध्ये उभारले होते. त्यात त्यांना भागीदार केले होते. त्यानंतर सीए विजय मर्दा, वैद्यकीय मशिनरी वितरक जगदीश कदम व इतरांशी संगनमत करून डॉ.सिनारे यांना शहर बँकेतून ५ कोटी ७५ लाखांचे कर्ज घ्यायला भाग पाडले.

ही रक्कम परस्पर वितरकांच्या नावे वर्ग केली.नंतर सदर रक्कम वितरकांकडून फिर्यादी सिनारे यांच्या नावे असलेल्या बनावट बँक खात्यात वर्ग करायला लावून त्या खात्यातून काढून घेत त्या रकमेचा अपहार केला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणात आरोपी असलेले सीए विजय मर्दा, वैद्यकीय मशिनरी वितरक जगदीश कदम यांना बुधवारी (दि.१३) सायंकाळी अटक केली. गुरुवारी (दि.१४) त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना दि. १८ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण हे करीत आहेत, या आरोपींना अटक करण्यात सायबर सेलचे पोलीस कर्मचारी राहुल गुंडू व नितीन शिंदे यांनी तांत्रिक सहकार्य केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles