शरद पवारांसोबत वळसेपाटील कुटुंबाचा राजकिय प्रवास सुरु झाला. याच प्रवासात तीन पिढ्या घडल्या. दिलीप वळसेपाटील यांना मानस पुत्र म्हणुन पवारांकडून सन्मान असताना पूर्वा वळसेपाटील यांनी वायबी चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आपल्या सामाजिक कामाला सुरवात केली. राज्यातील तरुणाईसाठी शिक्षण,आणि आरोग्य या दोन गोष्टींवर फोकस करत राज्यात काम केलंय हाच धागा पकडून वळसेपाटलांचा मतदार संघ असलेल्या आंबेगाव शिरूरमध्ये तरुणाईलासोबत घेऊन आदिवासी,गोरगरीबापर्यत थेट जाऊन कामाला सुरुवात केलीय.
तरुण चेहरा म्हणुन पूर्वा वळसेपाटील राजकारणात सक्रिय होणार या चर्चा असल्या तरी तालुक्यात इतर तरुण राजकारणात येत आहेत. त्यामुळे घराणेशाहीच्या राजकारणाला जनता स्विकारणार नसल्याचे विरोधक सांगत आहेत.
शिरुर लोकसभा मतदार संघ तसा शिवाजी आढळरावपाटीलांचा बालेकिल्ला. आढळरावपाटीलांना आवाहन देण्यासाठी अजित पवार, दिलीप वळसेपाटलांनी ऐनवेळी अभिनेते म्हणुन अमोल कोल्हेंना रिंगणात घेऊन आढळरावपाटीलांना पराभुत केलं. तसेच शिरुर लोकसभेवर वर्चस्व कायम ठेवलं.पण शिंदे गटात असलेले शिवाजी आढळरावपाटील देखील लोकसभेची तयारी करत असल्याने उमेदवारीची मोठी गुंतागुंत अजित पवार गटासमोर आहे. अशातच दिलीप वळसेपाटीलांच्या कन्या पूर्वा वळसेपाटील सक्रिय राजकारणात तरुणाईला साद घालत नवे पर्व… नवा ध्यास..! ही टॅगलाईन घेऊन पुढे येतायत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगलीय.