लोकसभा निवडणुकीमधून छगन भुजबळ यांना माघार घ्यावी लागल्याने समता परिषद आक्रमक झाली आहे. बीडमध्ये समता परिषदेने काळ्याफिती लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निषेध व्यक्त केला आहे.दरम्यान, आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार पाडणार आहोत. अशी भूमिका समता परिषदेचे नेते सुभाष राऊत यांनी स्पष्ट केलीय. यावेळी सुभाष राऊत म्हणाले की, छगन भुजबळ यांच्या पाठीशी तमाम ओबीसी समाज उभा राहिला आहे. नेमके हेच काही नेत्यांच्या डोळ्यात खूपत असून त्यांना रोखण्यासाठीच त्यांची नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होऊ दिली गेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री हे एकाच समाजाचे असल्यासारखे वागत असून ओबीसींवर जाणीवपूर्वक अन्याय सुरू आहे, असा आरोप समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष यांनी केलाय. आता आम्ही एकनाथ शिंदे यांचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार पाडणार असल्याची आक्रमक भूमिका देखील समता परिषदेच्या वतीने त्यांनी जाहीर केली आहे.