राजकारणी नेते आणि कार्यकर्ते यांचे नाते महत्वाचे असते. निवडणुका तोंडावर आल्यावर नेत्यांना कार्यकर्त्यांची आठवण येतेच. कारण कार्यकर्त्यांशिवाय शक्तीप्रदर्शन होत नाही. अशातच तरूणाई सुध्दा आपल्या नेत्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. निवडणूक काळात तर कार्यकर्त्यांची फौजच नेत्यांसमवेत चोवीस तास असते. यातूनच तरूणाईला विधायकतेकडे नेण्याऐवजी चुकीच्या दिशेने नेले जाते. याच परिस्थितीवर भाष्य करणारे अंतर्मुख करणारे गाणे सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे..साहेबांच्या पोरांचे मोठे मोठे धंदे…तुला नाही काम तुझे तंबाखूचे वांधे….अशी गीतरचना असलेल्या या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.