Tuesday, May 28, 2024

ट्रॅफिक सिग्नलवर उन्हापासून वाचण्याचा हटके जुगाड, Video

पुद्दुचेरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलजवळ हिरव्या कापडच्या जाळ्या बांधल्या आहेत. जेणेकरून ट्रॅफिक सिग्नलला थांबणाऱ्या नागरिकांना सावली मिळेल आणि उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार नाही. या उपक्रमामुळे सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या अभिनव उपक्रमाचे कौतुक करताना, जयरामचंद्रन या एक्स वापरकर्त्याने ट्रॅफिक सिग्नलवर रस्त्यावर या हिरव्या जाळ्या लावल्याचे दर्शवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या उपक्रमाबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
https://x.com/Jayaram9942Blr/status/1785539985669853425

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles