बोगस प्रमाणपत्र जमा करून आयएएस झालेल्या पूजा खेडकरवर आता यूपीएससीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. पूजा खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी असल्याचं समोर आलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. आता तिला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बनावट प्रमाणपत्र आणि नाव बदलून नियमांचे उल्लंघन करत अनेक वेळा युपीएससी परीक्षा दिल्याच्या आरोपामुळे पूजा खेडकर वादात सापडली. पुण्यातील प्रशिक्षणार्थी काळातच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक आणि वडिलांकडून अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा केल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले होते.
केंद्रीय लोक सेवा आयोगाने चौकशी करून पूजा खेडकरवर कारवाई केली. त्यानंतर केंद्रानेही मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने प्रशासकीय सेवा प्रोबेशन नियम,१९५४ च्या १२ व्या नियमानुसार पूजा खेडकरवर ही कारवाई केली आहे. तिला भारतीय प्रशासकीय सेवेतून तात्काळ मुक्त केले आहे.