Monday, September 16, 2024

Pooja Khedkar :पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट, UPSCचे सर्व आरोप फेटाळले

पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात रिजॅाईंडर दाखल केले आहे. पूजा खेडकरने यूपीएससीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. यूपीएससीच्या आरोपात तथ्य नसल्याचं पूजा खेडकरचे म्हणणं आहे. पूजा खेडकरनं नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप यूपीएससीनं केला होता. पण नाव बदलल्याची माहिती आपण आधीच यूपीएससीकडे दिली असल्याचं पूजा खेडकरनं स्पष्टीकरण दिलं आहे. पूजा खेडकर प्रकरणी आता उद्या पुन्हा दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मिळणार की फेटाळला जाणार यावर उद्या निर्णय होणार आहे.

पूजा खेडकरच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत. याआधीच यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे. इतकंच नाही तर पूजा खेडकर यांना पुन्हा परीक्षेला बसता येणार नसल्याचं देखील यूपीएससीने म्हटलं होतं. पूजा खेडकर प्रकरण अनेक दिवसांपासून देशभरात चर्चेत आलं होतं. खोटी माहिती सादर करुन परीक्षा पास झालेल्या आरोप पूजा खेडकरवर होता. पूजा खेडकर यांच्या विरोधात यूपीएससीने गुन्हा दाखल केला होता. अटक होऊ नये म्हणून आधीच पूजा खेडकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकिलांनी अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केलाय. पूजा खेडकरला जामीन मिळाल्यास चौकशीत त्या सहकार्य करणार अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles