अभिनेत्री पूजा सावंतने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पूजाने सोशल मीडियावर एका खास व्यक्तीसोबत फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करत तिने साखरपुडा केल्याचं जाहीर केलं आहे. पूजाच्या या फोटोंवर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मात्र तिने साखरपुडा कोणाशी केला आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. कारण पूजाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या जोडीदाराचा चेहरा दिसत नाहीये. त्याचे पाठमोरे फोटो पूजाने पोस्ट केले आहेत.
- Advertisement -