Saturday, January 25, 2025

पोस्टाच्या ‘या’ योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर…

पोस्टाच्या अशा कितीतरी योजना आहेत ज्यात गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळतो. पण पोस्टाची ही योजना महिन्याकाठी केवळ हजार रुपयांचा गुंतवणुकीवर बसल्या बसल्या लाखभर रुपयांचा परतावा देणारी म्हणून ओळखली जाते. या योजनेत पैसे गुंतवून कुठलीही व्यक्ती दर महिन्याला कमाई करू शकते. निवृत्ती घेतलेल्या व्यक्तींसाठी ज्यांना कमाईचे साधन नाही अशा लोकांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. पण विशेष म्हणजे आपल्या पत्नीसोबत जर या योजनेत गुंतवणूक केली पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेत घरबसल्या वर्षाकाठी लाखभर रुपयांची कमाई सहज होऊ शकते. काय आहे योजना? जाणून घेऊया..

पोस्टाची ही गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरतेय .सेवानिवृत्त झालेल्यांसाठी तर हा उत्कृष्ट पर्याय असल्याचा सांगण्यात येतंय . नावाप्रमाणेच या योजनेची बांधणी अशाप्रकारे केली गेली आहे की गुंतवणूकदारांना मासिक उत्पन्न मिळेल . यात एकट्याला किंवा जॉइंट अकाउंट असणाऱ्या तसेच सामान्य खातेदारांना गुंतवणूक करता येते . कमीत कमी हजार रुपयांपासून 9 लाख रुपयांपर्यंत तर जॉईंट अकाउंट असणाऱ्यांना 15 लाख रुपयांपर्यंत यात गुंतवणूक करता येते .ही 5 वर्षांच्या कार्यकाळाची योजना आहे .

पाच वर्षांसाठी करा गुंतवणूक
पोस्टाच्या या योजनेअंतर्गत सिंगल खाते असणाऱ्या व्यक्तीला 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते . सिंगल खात्यात गुंतवणुकीच्या ठेवेची मर्यादा कमी असून जॉईंट अकाउंट असेल तर ही मर्यादा वाढते . दोन किंवा तीन लोकांनी एकत्र जॉईंट अकाउंट काढत या योजनेत गुंतवणूक केली तर अधिक परतावा मिळू शकतो . त्यामुळे सेवानिवृत्त खातेदारांना त्यांच्या पत्नीसोबत संयुक्त खाते उघडत अधिक कमाई करता येईल . संयुक्त खात्याची मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत आहे . जात पाच वर्षांसाठी 7.4% व्याजदराने परतावा मिळतो .

7.4 % व्याजाने परतावा
जर जॉइंट अकाउंट उघडून पत्नीसोबत या योजनेत तुम्ही 15 लाख रुपये तुम्ही जमा केलेत तर तुम्हाला 7.4% व्याजाने वार्षिक 1 लाख 11 हजार रुपयांची कमाई करता येईल . आणि दरमहा 9250 मिळतील . याचा अर्थ
111000 x 5 yr = 555000 पाच वर्षात तुम्हाला फक्त व्याजातून मिळेल . जर सिंगल खात्यात गुंतवणूक करायची असेल, तर जर जास्तीत जास्त नऊ लाख रुपये जमा केले तर 7.4% व्याजाने तुम्ही वर्षात 66 हजार 600 रुपये व्याज कमवू शकता . आणि महिन्याला 5500 रुपयांची रक्कम तुम्हाला मिळेल . म्हणजे केवळ व्याजाद्वारे पाच वर्षात तीन लाख 33 हजार रुपये तुम्ही कमवू शकता .

या योजनेसाठी कोण खाते उघडू शकतो ?
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये कोणत्याही देशाचा कोणताही नागरिक खाते उघडू शकतो . आपल्या मुलांच्या नावाने हे खाते उघडता येते . जर मुलाचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याचे पालक त्याच्या नावावर खाते उघडू शकतात . दहा वर्षांचा झाल्यावर त्याला स्वतःच खातच चालवण्याचा अधिकार मिळतो . पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये तुमचे बचत खाते असले पाहिजे . यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड देणे बंधनकारक आहे .

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles