Monday, July 22, 2024

पोटच्या मुलाने केला बापाचा खून ! अहमदनगरमधील घटना

अहमदनगर-शेतजमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत ८० वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाविरोधात येथील राहाता पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल विश्वनाथ साळवे (रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीत म्हटले आहे की, मयताचा मुलगा अनिल गणपत कोळगे (वय ५३) याने शेतजमीन त्याच्या नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून वडील गणपत संभाजी कोळगे (वय ८०, रा. जाधव वस्ती, कोऱ्हाळे, ता. राहाता) यांना घराच्या शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावात सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यातील आरोपी मुलगा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मयताचे नातेवाईक अमोल विश्वनाथ साळवे (रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीत म्हटले आहे की, मयताचा मुलगा अनिल गणपत कोळगे (वय ५३) याने शेतजमीन त्याच्या नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून वडील गणपत संभाजी कोळगे (वय ८०, रा. जाधव वस्ती, कोऱ्हाळे, ता. राहाता) यांना घराच्या शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी अनिल कोळगे हा फरार झाला आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर राहाता पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोपानराव काकड, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles