प्रदेश काँग्रेसने विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांचे मागवले अर्ज
अहमदनगर : राष्ट्रीय काँग्रेस पक्ष्याकडून विधानसभा निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरु असून विधानसभेच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी प्रदेश कार्यालयात बैठकावर बैठका घेण्यात येत आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळून काँग्रेस इतर पक्ष्याच्या मनाने एक नंबरला आल्याने काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले साहेबांनी राज्यातील काँग्रेसच्या सर्व जिल्हा अध्यक्ष्याना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरून घेण्यासंदर्भात व इच्छुक उमेदवारांनी 10 ऑगस्ट पर्यंत प्रदेश कार्यालयात संपर्क साधण्यासंदर्भात पत्राद्वारे सूचना दिलेल्या आहेत. तसे पत्र नाना पटोले साहेबांच्या आदेशानुसार प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रशासन संघटक नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीने काढले आहे..
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अतिशय चांगली कामगिरी करत महाराष्ट्रातुन इतर पक्ष्याच्या मानाने सर्वात जास्त खासदार केंद्रात दिलेले आहेत त्यामुळे काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे त्यामुळेचं विधानसभा निवडणुकीत जास्त जागा काँग्रेसला अपेक्षित असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी म्हटलं आहे.त्यानुसार विधानसभा लढण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी प्रदेश कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन प्रदेश कार्यालयाकडून करण्यात आले आहे.. ज्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज येतील त्यांच्याचं नावाचा विचार पक्ष्याकडून होईल असेही सांगण्यात आले आहे…
प्रदेश काँग्रेसने विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांचे मागवले अर्ज, अहमदनगर मधुन यांनी…….
- Advertisement -