Saturday, January 25, 2025

प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ भरती मेळाव्याचे ९ डिसेंबर रोजी आयोजन

शिकाऊ भरती मेळाव्याचे ९ डिसेंबर रोजी आयोजन
अहिल्यानगर, दि.५- प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ मेळाअंतर्गत कै. माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुरूडगाव रोड, अहिल्यानगर येथे ९ डिसेंबर, २०२४ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिकाऊ उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य के.ए.जहागीरदार यांनी केले आहे.
मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या लिंक अथवा क्यू आर कोडद्वारे नोंदणी करावी. तसेच दहाणी उत्तीर्ण, आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड आदी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह मेळाव्यास उपस्थित रहावे असेही कळविण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles