विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने जंगली रमीची जाहिरात केल्याच्या विरोधात सोलापुरातील अकोलेकाटी गावातील गणपती मंडळपुढे चक्क भीकपेटी ठेवण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी या मंडळाला भेट देत गणरायाची पूजा केली. त्यानंतर या पेटीत स्वतः 100 रुपये टाकत सचिन तेंडुलकरवर टीका केली. महाराष्ट्रातील प्रहार संघटनेच्या विचारांचे जितके गणेश मंडळ आहेत तिथे अशा भीक पेटी ठेवल्या जातील. यात जमा होणारे पैसे विसर्जन झाल्यानंतर तेंडुलकर यांच्या घरी पोहचवू अशा इशारा देखील आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिला.