Thursday, March 20, 2025

तर एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघही भाजप ठरवेल…महायुतीला घरचा आहेर…

आमदार बच्चू कडू महायुतीत आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली होती. आता बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेम भाजपने केला. अमरावतीत सर्व नवनीत राणा यांच्या विरोधात होते. त्यानंतरही शिवसेनेच्या या जागेवर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली गेली. शिवसेनेच्या सोबत राहून भाजपने असे करने योग्य नाही. भाजप काहीही करू शकते. उद्या ते एकनाथ शिंदे यांना पण म्हणतील या मतदार संघात उभे राहू नका, त्याऐवजी या मतदारसंघात उभे रहा. त्यांच्याकडे सत्ता आहे तर ते काहीही करतील. अमरावतीत भाजपचे कार्यकर्ते म्हणत होते तरी अमरावतीमध्ये उमेदवार बदलला नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. उमेदवार एकनाथ शिंदे साहेबांचे आणि उमेदवारी द्यायची की नाही हे भाजप ठरवत होते. हा अफलातून कारभार आहे. अजित पवार यांचे उमेदवार देखील भाजपने ठरवले, असे त्यांनी म्हटले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles