Sunday, July 14, 2024

केंद्रीय मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू..video

मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारासाठी दाखल झालेले केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र त्यांच्यासोबत बसलेल्या एका एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल हे अमरवाडा, छिंदवाडा येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. तेथून कार्यक्रम आटोपून ते परतत असताना अमरवाड्याच्या सिंगोडी बायपासजवळ हा भीषण अपघात झाला.
नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, कार्यक्रम आटोपून मंत्र्यांचा ताफा परतत होता. दरम्यान, बायपासवर चुकीच्या बाजूने त्यांच्या वाहनासमोर एक दुचाकी आली आणि तिला चुकवताना चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कारचे नियंत्रण सुटले आणि कार इतर वाहनांना धडकून रस्त्याच्या कडेला गेली.
दुचाकी वाचवण्याच्या प्रयत्नात कार इतर वाहनांना धडकली. त्यामुळे मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या गाडीचे नुकसान झाले. कारमधून प्रवास करणाऱ्या पटेल यांचा जीव थोडक्यात बचावला. त्यांना पायाला दुखापत झाली आहे, तर त्यांच्यासोबत प्रवास करणारे माध्यम सल्लागार नितीन त्रिपाठी यांनाही दुखापत झाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles