Tuesday, February 27, 2024

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीची आता ‘भिशी मित्र मंडळ’मध्ये एंट्री

नगर : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे. आजपर्यंत अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिकांच्या मनावर उमटवली आहे. आता ती आपल्याला एका नवीन चित्रपटातून भेटायला येण्यास सज्ज झाली आहे. “भिशी मित्र मंडळ” असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. याप्रसंगी अभिनेत्री प्राजक्तासोबत चित्रपटाचे निर्माते, प्रस्तुतकर्ते, लेखक, दिग्दर्शक आणि तांत्रिक टीम उपस्थित होती.
अमोल कागणे आणि शरद पाटील हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत तर किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सागर पाठक लिखित आणि सुमित संघमित्र दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण आता लवकरच पुणे येथे सुरु होणार असून संजीवकुमार चंद्रकांत हिल्ली ये या चित्रपटाचे सिनेमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत.

भिशी म्हणजे, ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून ते टप्प्याटप्प्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात. साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून ते एक सदस्याला दिले जातात. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. त्यावरच आधारित या चित्रपटाची कथा आहे. धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक असलेल्या या “भिशी मित्र मंडळ” चित्रपटात प्राजक्तासोबत कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार आहे हे अजून सांगण्यात आलेले नाही. त्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles