Friday, December 1, 2023

प्राजक्ता माळीच्या आलिशान फार्म हाऊसमध्ये रहायचय ? एवढे पैसे मोजायची तयारी ठेवा

प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फार्महाऊसमधील फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं ती म्हणाली होती. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची टीमदेखील प्राजक्ताच्या वाढदिवशी या फार्महाऊसवर गेली होती. तिने फोटो शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी या फार्महाऊसमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता अभिनेत्रीने हे फार्महाऊस भाड्याने द्यायला सुरुवात केली आहे. प्राजक्ता माळीचा 3 बीएचके व्हीला आहे. 3 बेडरूम्स, हॉल, किचन , स्विमिंगपूल असं तिचं आलिशान फार्महाऊस आहे. राजक्ताने ‘Stay Leisurely’ यांच्याकडे तिचं फार्महाऊस हँडओव्हर केलं आहे. प्राजक्ताच्या फार्महाऊसचं नाव ग्रीन मोन्टाना असं आहे. या फार्महाऊसमध्ये एकावेळी 15 पेक्षा अधिक मंडळी राहू शकतात. या फार्महाऊसमध्ये दोन व्यक्तींना एक रात्र राहायचं असेल तर त्यासाठी 20,250 रुपये मोजावे लागणार आहेत. जेवणाचा वेगळा खर्च असणार आहे.

फार्महाऊसमधील स्वयंपाकघरात ओव्हन, गॅस अशा सुविधा दिलेल्या आहेत. पण या फार्महाऊसमध्ये जेवण बनवायला बंदी आहे. जवळच्या हॉटेलमधून पर्यटक ऑर्डर करू शकतात. ते जेवण गरम करण्यासाठी ओव्हन आणि गॅसचा वापर करता येऊ शकतो. या फार्महाऊसमध्ये पाळीव प्राण्यांना घेऊन जाता येणार नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: