विजयादशमीनिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. प्राजक्ताचा हा व्हिडीओ सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे.
आपल्या इन्स्टाग्रामवर प्राजक्ताने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. नागपूरमध्ये विजयादशमीनिमित्त ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ने ‘विजयादशमी उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्राजक्ताने हजेरी लावली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते
प्राजक्ताने व्हिडीओ पोस्ट करीत लिहिलं “आज आयुष्यात पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा – विजयादशमी उत्सव अनुभवता आला. तेही केंद्रीय मंत्री – नितीनजी गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत. समस्त संघ परिवाराचे यासाठी मनापासून आभार.”