अभिनेत्री प्राजक्ता माळी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ताने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अनोख स्थान केलं आहे. प्राजक्ताला नृत्याची विशेष आवड आहे. अभिनेत्री, निवेदिका आणि बिझनेसवूमन अशा सर्व क्षेत्रात प्राजक्ता यशस्वी ठरली आहे.
अभिनेत्रीने प्राजक्ताचा नवीन ‘फुलवंती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटातून प्राजक्ताने तिचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. प्राजक्ता माळी फुलवंती या चित्रपटाची निर्माती आहे. प्राजक्ताचा फुलवंती हा चित्रपट ११ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
नुकतंच प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हॅडलवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये प्राजक्ता माळी फुलवंती गाण्यातील डान्स स्टेप्स करत आहे. पोस्ट शेअर करत प्राजक्ताने, “फुलवंती बाईसाहेब “फुलवंती” गाण्याची शिकवतायेत… ” असं कॅप्शन दिलं आहे. प्राजक्ताने फुलवंती गाण्यातील डान्स कसा आहे. यांच्या हुकस्टेप्स करून दाखवल्या आहेत. तसेच प्राजक्ताने या गाण्यावर डान्स करून तिला टॅग करण्याचे आवाहन केले आहे. प्राजक्ता माळी या व्हिडीओ तिच्या अकाउंटवर पोस्ट करणार आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्राजक्ताच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्याकडून लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत. तर अनेकांनी फुलवंती या गाण्यावर डान्स स्टेप्स केल्या आहेत.