अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने आताही आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तिने तिचा ३१ डिसेंबरची मज्जा शेअर केली आहे. २०२३ या वर्षाचा शेवटचा दिवस आपण कसा साजरा केला हे तिने दाखवलं आहे. तिने आपल्या कुटुंबासोबत धमाल केली आहे. या व्हिडिओत तिचं संपूर्ण कुटुंब दिसतंय. सोबतच तिने वर्षाचा शेवटचा आणि पहिला सेल्फीदेखील शेअर केला आहे.
प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडिओत तिचं कुटुंब दिसतंय. ते सगळे बॉबी देओल याच्या ‘जमाल कुडू’ या गाण्यावर नाचताना दिसतायत. सगळेच डोक्यावर ग्लास आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन नाचताना दिसतायत. प्राजक्ताची त्यांच्यासोबत मजा करतेय तर तिचे वडील ‘डॉन’ मधील गाण्यावर नाचताना दिसतायत. त्यानंतर प्राजक्ता चुलीवर जेवण बनवताना दिसतेय.