Tuesday, May 13, 2025

मोठी बातमी! सेक्स स्कँडलप्रकरण प्रज्ज्वल रेवन्नाला बंगळुरू विमानतळावरून अटक

कर्नाटक सेक्स स्कँडलप्रकरणी एसआयटीच्या पथकाने जेडीसएसचे निलंबित नेते प्रज्ज्वल रेवण्णा याला अखेर अटक करण्यात आली आहे. एसआयटी पथकाने बंगळुरू विमानतळावरून त्याला ताब्यात घेतलं आहे. आजच प्रज्ज्वल रेवण्णाला कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणात कोर्ट नेमका काय निर्णय देतं? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
प्रज्वल रेवण्णा भारतात येणार अशी माहिती इंटरपोलने एसआयटी पथकाला दिली होती. यानंतर पथकाने बंगळुरू विमानतळावर अटकेसाठी पूर्वतयारी करून ठेवली होती. शुक्रवारी म्हणजेच ३१ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास प्रज्जवल रेवण्णाचं विमान बंगळुरूत विमानतळावर दाखल झालं.

प्रज्वल रेवण्णा भारतात पोहोचताच एसआयटी पथकाने त्याच्यावर अटकेची कारवाई केली. सध्या रेवण्णा एसआयटी पथकाच्या ताब्यात असून आज दुपारपर्यंत त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. बुधवारी प्रज्वल रेवण्णानं अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता.

https://x.com/ani_digital/status/1796341323068531030?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1796341323068531030%7Ctwgr%5Ea7ea6e3b9dad61d111e527770cdf88359a3cecb9%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fnational-international%2Fprajwal-revanna-arrested-from-bangalore-airport-will-be-produced-in-court-today-ssd92

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles