माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू व जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अडचणी वाढल्या आहेत. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका अश्लील व्हिडीओ प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची घोषणा कर्नाटक सरकारने काल केली आहे. या प्रकरणात रेवन्ना यांचे नाव आल्याने ते देश सोडून पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे हा देवेगौडा यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेवन्ना हे जर्मनीला रवाना झाले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेवन्ना यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले. त्यानंतर एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.