Saturday, May 18, 2024

मोदी सरकार पुन्हा आले तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत… केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे वक्तव्य…

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती परकला प्रभाकर यांनी मोठे विधान केले आहे.

“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत”, असा दावा परकला प्रभाकर यांनी केला आहे. परकला प्रभाकर यांचा एक व्हिडिओ काँग्रेसने अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना परकला प्रभाकर यांनी हा दावा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर पुढे काय होईल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर परकला प्रभाकर म्हणाले, “जर असे झाले तर पुन्हा निवडणुकीची अपेक्षा तुम्ही करु नका. आता २०२४ ची निवडणूक होत आहे. यामध्ये जर हे सरकार पुन्हा आले तर यानंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत. तुमच्याकडे असलेले देशाचे संविधान आणि नकाशा पूर्णपणे बदलेल. तुम्हाला ते ओळखताही येणार नाही. आता जे तुम्ही काही ऐकता एखाद्याला पाकिस्तानला पाठवा, त्याला तिकडे पाठवा. पण यानंतर अशा पद्धतीचे तुम्हाला लाल किल्ल्यावरून ऐकायला मिळेल. आता जे मणिपूरमध्ये होत आहे. उद्या ते आपल्या परिसरातही होऊ शकते. आता मणिपूर, लडाखमध्ये जी परिस्थिती आहे, तशी परिस्थिती संपूर्ण देशात होईल”, असे परकला प्रभाकर यांनी म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles